227
0
राजश्री शाहू छत्रपती सभाग्रह, कोल्हापूर जिल्हा परिषद येथे पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त संदर्भात जिल्हास्तरीय आढावा बैठक माझ्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी अनेक मुद्दे मांडण्यात आले. आणि अधिकाऱ्यासमवेत प्रत्येक गावांमधील ओद्योगिक वसाहतींचा आढावा घेऊन प्रदूषण मुक्ती करू,असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल प्रकाश आवाडे (साहेब), जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, गायकवाड साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल, उपाध्यक्ष सतीश पाटील इ.मान्यवर आणि सर्व भागातील मान्यवर उपस्थित होते. @prakash_awade
173
0
▪कबनूर नगरपंचायत व्हावी यासाठी साखळी उपोषणास पाठींबा..▪ कबनूर गावाचा विस्तार वाढत असून लोकसंख्या 50 ते 55 हजारच्या आसपास गेली आहे. त्यामुळे कबनूर ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांच्या मुलभूत गरजा पुरविण्यास असमर्थ ठरत आहे. ग्रामविकास निधी हा पाणीपुरवठा योजनेवर खर्च होत आहे. सध्या असणारी “जलस्वराज्य योजना ही मुदतबाह्य ठरत आहे. पाणी पुरवठा योजना सक्षम होणे व मुबलक पाणी गावाला मिळणे गरजेचे आहे. तसेच गावविकास आराखडा वाढीव वस्त्यांमुळे सुनियोजित करणे ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेर आहे. तसेच घणकचरा उठाव व कचऱ्याची विल्हेवाट लावणे अशक्य आहे. गावात खेळाचे मैदान, बागबगीचा या सुख-सुविधाही ग्रामपंचायत पुरवू शकत नाही. ग्रामपंचायतीमध्ये रोजगारीवर असणाऱ्या कामगारांचे पगार नियोजन ग्रामपंचायत करु शकत नाही. घरफाळा, पाणीपट्टी, इत्यादी कर मुलभूत नागरी सुविधा मिळत नसलेने करदाते कर भरण्यास असमर्थता दर्शवितात त्यामुळे कर गोळा होत नाही. गावातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी अद्यावत दवाखाना गरजेचा आहे. वाहतूक कोंडीमुळे होणारे त्रास, अपघातापासून मुक्ती मिळण्यासाठी पर्यायी रस्त्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. या सर्व सुविधा ग्रामपंचायतीच्या आवाक्या बाहेर आहे. ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायत मध्ये व्हावे, यासाठी कबनूर ग्रामस्थांच्या वतीने साखळी उपोषणास उपस्थित राहून पाठिंबा जाहीर केला. तसेच कबनूर नगरपंचायत झाल्याशिवाय यावर्षी मे महिन्यात होणारी कबनूर ग्रामपंचायत निवडणूक होणार नाही असा विश्वास दिला. तसेच २६ जानेवारी २०२० रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये हा ठराव एकमुखी मंजूर करण्यात येईल आणि या मागणीमध्ये येणाऱ्या सर्व अडचणीमध्ये मदत करण्याची ग्वाही दिली. यावेळी उपोषणकर्ते, कबनूर ग्रामस्थ उपस्थित होते.
180
0
इचलकरंजीच्या विकासात खाटीक समाजाचे योगदान महत्त्वाचे आहे. या समाजाच्या जागेवर भव्य अशी वास्तू उभारण्यासाठी आमदार फंडासह समाजकल्याण योजनेतून आणि नगरपरिषदे मार्फत जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू,अशी ग्वाही दिली. @prakash_awade
151
0
राष्ट्रीय मतदार दिवस... आपल्या विकासाचे आपणच खरे साक्षीदार लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणजे तुमचे मत! आपल्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी आजच करा ऑनलाइन मतदार नोंदणी! आज २५ जानेवारी, राष्ट्रीय मतदार दिवस! मतदाता नक्की बना....... #NationalVotersDay
176
0
हातकणंगले तालुक्यातील माणगांव येथ सन १९२०. साली रा.छ.शाह महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक परिषद झाली होती. महाराष्ट शासनाने माणगांव या गांवामध्ये डॉ.बाबासो आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक मंजूर केले. असून त्याचे कामही सुरू झाले आहे. या गावाचे नाव पर्यटन स्थळांच्या यादीत नोंद आहे. गावातील तलाव सुशोभिकरणाकरीता दि.११/०२/२०१९ च्या प्रस्तावाने मा.विभागीय वनअधिकारी, सामाजिक वनीकरण, कोल्हापूर यांचे कार्यालयाने प्रशासकीय मंजूरी देऊन जिल्हा नियोजन मंडळाकडे नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत निधी उपलब्ध होणेसाठी हा प्रस्लाव प्रलंबित आहे. तरी, उपरोक्त कामाच्या अनुषंगाने निधी उपलब्ध करून द्यावा, ही विनंती कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. कळावे, आमदार प्रकाशआण्णा आवाडे
318
0
आज राजश्री शाहू छत्रपती सभागृह, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल प्रकाश आवाडे, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषद मुख्याधिकारी अमन मित्तल, कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक बजरंग पाटील व जिल्हा परिषद सदस्य शासकीय अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
206
0
आज राजश्री शाहू छत्रपती सभागृह, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल प्रकाश आवाडे, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, वस्त्रोद्योग मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ अध्यक्ष योगेश जाधव, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू बाबा आवळे, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषद मुख्याधिकारी अमन मित्तल, कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक बजरंग पाटील व जिल्हा परिषद सदस्य शासकीय अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
206
0
हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन...!
177
0
23 जानेवारी ... तुम मुझे खून दो मैं तुम्हे आज़ादी दूँगा... थोर स्वातंत्र्यसैनिक, राष्ट्रीय नायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. #जय_हिंद..🇮🇳